¶ जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोणताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठयाने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला.
TSK
TSK · ईयो 2:8
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.
माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील.
‹“हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.›