एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
TSK
TSK · योए 1:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.
दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
म्हणून स्वत:ला गोणताट गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही.”
आणि ते अंगावर पोते गुंडळतील, त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेल; त्यांच्या चेहऱ्यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल.
जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील?
¶ तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले.
जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?
उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही.