चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
TSK
TSK · योए 2:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
¶ जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.
“सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो. “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
“यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
परमेश्वर देव हे सांगतो, अनर्थ! अनर्था मागे अनर्थ! पाहा तो येत आहे.
वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे.
मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तलवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतितीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.
पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन.
हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे यरूशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरूशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.
गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा.
त्या भयानक दिवसाकरता हायहाय! कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.
मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत.
तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे; मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही.
प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत राहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे; कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.
तो दिवस तटबंदीच्या शहरांविरूद्ध आणि उंच बूरूजांविरूद्ध तुतारीच्या शब्दाचा व गजराचा असा आहे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
¶ म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.