TSK

TSK · योहा 20:31

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.

तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”

आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”

यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.

नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”

‹जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.›

‹मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.›

‹माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”›

¶ त्यांनी त्यास बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्यास तो सापडल्यावर तो त्यास म्हणाला, ‹“तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”›

आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.

आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.

फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.

जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”

ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.

जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे.

¶ येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.

पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.

¶ ‹थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र हे सांगत आहे, ›