TSK

TSK · यहो 10:39

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.

त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.

परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.

आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”

आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.