हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन राहत होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
TSK
TSK · यहो 13:16
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली.
अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही.
जेव्हा इस्राएल हेशबोनात व त्याच्या गावात, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत.
हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
आता डोंगराळ प्रदेशावर शिक्षा आली आहे, होलोनावर, याहस व मेफाथ