TSK

TSK · यहो 13:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,

इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.

तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.

मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.

तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.

¶ किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.

गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.