याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
TSK
TSK · यहो 21:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
¶ मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या.
¶ त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.