TSK

TSK · शास्ते 4:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.

इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.

पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; त्यांच्यातला एकही वाचला नाही.

पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापती सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.

परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,