TSK

TSK · शास्ते 4:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

बऱ्याच काळानंतर मिसराचा राजा मरण पावला. तेव्हा इस्राएलांनी दास्यामुळे कण्हून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरता हाका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहचला;

तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल, लोक तुमची उपेक्षा करतील.

नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.”

इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?

तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.”

नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.”

जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.

हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.” कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी, ते आपल्या संकटात म्हणतील, “उठ आणि आम्हांला तार.”