TSK

TSK · लेवी 1:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.

नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;

त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.

¶ त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.

¶ पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.

¶ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.

¶ आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.

त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.

¶ मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”

मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.

वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.

¶ म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.

हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.

पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले; तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला.

आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;

¶ म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.

पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.

तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.