TSK

TSK · लेवी 17:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये.

¶ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.

¶ अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.

¶ कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्राएल लोकांस म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.

‹म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”›

मग येशू म्हणाला, ‹“हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.›

मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.

आणि त्याच्याठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.

खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही.

देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत.

तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.