TSK

TSK · लेवी 20:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.

जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”

म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.

दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात तू जा; मी तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात. मी आलो तर रस्त्यातच तुम्हास नष्ट करीन.”

कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,

मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.

कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे.

‹जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते, ›

¶ पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.