तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
TSK
TSK · लेवी 20:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
¶ कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
आपल्या पोटच्या मुलाबाळांचा वेदीवर बली देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, शकुनमुहर्त पाहणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.
¶ शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
¶ ते तुम्हास म्हणतील, “भूतवैद्य व मांत्रिक यांचा सल्ला घ्या” जे काहीतरी बरळतात व मंत्र पुटपुटतात. परंतु लोकांनी त्यांच्या देवाचा सल्ला घ्यावा काय?
माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.