TSK

TSK · लेवी 23:34

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.

¶ सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.

मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “प्रत्येक सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.

याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले याजकही नेमले.

परमेश्वराने मोशेद्वारे लोकांस हे नियमशास्त्र दिले. त्यामध्ये यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी या सणा दरम्यान तात्पुरत्या तंबूत रहावे.

¶ यरूशलेमेशी लढण्यास आलेल्या राष्ट्रांपैकी जे वाचतील ते सर्व, सेनाधीश परमेश्वराची उपासना करण्यासाठी, मंडपाचा सण साजरा करायला, दरवर्षी यरूशलेमेला येतील.

¶ ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिसराला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल.

यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता.

¶ हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.