TSK

TSK · लेवी 25:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.

¶ आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.

त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.

¶ स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,

आणि जेव्हा इस्राएलाच्या वंशाचे योबेल होईल तेव्हा ज्यांच्या त्या होतील त्यांच्या वंशाच्या वतनात त्यांचे वतन मिळवले जाईल, अशाने त्यांचे वतन आमच्या वडिलांच्यावंशाच्या वतनातून काढून टाकले जाईल.

तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.

वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?

परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला, आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.

¶ सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले.

परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे,

पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.

ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,

‹तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”›

आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.

¶ कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.

त्यांना ते स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः दुष्टतेचे दास असतात कारण ज्याच्याकडून कोणी जिंकलेला आहे त्याच्या दासपणातही तो आणलेला आहे.