TSK

TSK · लेवी 26:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.

जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील.

¶ त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”

तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.

त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.

सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.

नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.”

यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.

दूर व्हा, “दूर व्हा! अमंगळ लोकहो.” आम्हास स्पर्श नका करू, असे लोक त्यांना म्हणाले, ते पळून जाऊन भटकत राहीले, तेव्हा राष्ट्रांमधील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये.”

मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन.

रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन.

कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.

‹ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.›