TSK

TSK · लेवी 26:38

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.

परमेश्वर तुम्हास जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हास पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हास विकत घेणार नाही.

ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.

म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरीने मराल.”

पाहा, मी त्यांच्या चांगल्यासाठी नाही तर त्यांच्या अनिष्टासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. यहूदा देशातला जो प्रत्येक व्यक्ती मिसर देशामध्ये आहे त्यांचा अंत होईपर्यंत ते तलवारीने नाश होईल.