¶ माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल;
TSK
TSK · लेवी 26:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हास खाण्याकरता पुष्कळ असेल.
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”
जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.
त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील. आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण असे असेल.
मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका. कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडे त्यांचे फळे देतील, आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील.
परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील.
¶ ‹“हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.›
परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.
आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.