TSK

TSK · लेवी 3:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.

त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.

¶ त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.

¶ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.

तो आपल्या जिवाच्या दुःखसहनानंतर, तो पाहील व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नितीमान सेवक पुष्कळांचा न्याय करील; तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल.

म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.

कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.

¶ म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.