TSK

TSK · लेवी 8:12

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर;

जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकावंर दोष येईल, असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.

¶ मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.

¶ आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;