TSK

TSK · लूक 1:48

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले.

तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.

यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?

तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.

कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.

“सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील, कारण तुमची भूमी आनंदाची होईल,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.

¶ तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते,