TSK

TSK · लूक 10:31

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.

माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.

माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.

ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.

भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”

जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.

कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.