¶ आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.
TSK
TSK · लूक 11:42
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एक दशांश भाग आणून दिला.
योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत.
सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.
यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!
हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
¶ तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्यास त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे.
¶ ‹अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.›
¶ ‹अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत.›
‹परंतु मी तुम्हास ओळखले आहे की, तुमच्यात देवाविषयी प्रीती नाही.›
“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.