TSK

TSK · लूक 17:22

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

येशूने त्यांना उत्तर दिले, ‹“जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.›

‹पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.”›

यावरुन येशू त्यांना म्हणाला, ‹“मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.›

यावरुन येशू त्यांना म्हणाला, ‹“आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी कि अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही.›

‹पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही.›

‹आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.›