स्तोत्र 58:4
TSK
त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
¶ परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?
‹तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल?›
“सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.