TSK

TSK · मला 1:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!

तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?

हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस.

तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल,

परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”

“मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो, मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत.

“माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे.

तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता. आणि म्हणता, ‘कशामुळे आम्ही तुला विटाळवीले?’ परमेश्वराचा मेज तुच्छ आहे, असे बोलून तुम्ही ते विटाळवता.

¶ ‹लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही.›

¶ ‹जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे.›

¶ नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, ‹“शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?›