परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
TSK
TSK · मार्क 1:40
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
ढग निवास मंडपापासून वर गेला. आणि मिर्याम अचानक बर्फासारखी पांढरी झाली होती. तेव्हा अहरोन मिर्यामकडे वळाला, त्याने पाहिले मिर्याम कोडी झाली.
यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”
वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसलो अहोत?
बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले.
‹आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.›
पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”
¶ आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली,
¶ या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.