TSK

TSK · मार्क 10:27

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!

“परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही.

“पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?”

येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, ‹“मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”›

तो म्हणाला, ‹“ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”›

म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.