¶ योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
TSK
TSK · मार्क 16:17
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ ‹मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.›
म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.
असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले.
पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
¶ मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.