TSK

TSK · मत्त. 1:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”

मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?

लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.

पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,

¶ म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.