TSK

TSK · मत्त. 17:27

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”

आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.

आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, ‹“ह्यामुळे तुम्ही अडखळता काय?›

¶ म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये.

म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही.

यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

¶ तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,

¶ माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?