TSK

TSK · मत्त. 17:6

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.

दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.

आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो.

¶ मी दानीएल एकट्याने हा दृष्टांत पाहिला माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी काही पाहिले नाही तरीही त्यांना मोठी भिती वाटली आणि लपण्यासाठी तेथून ते पळून गेले.

तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि ‹“शौला, शौला, माझा छळ का करितोस?”› अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली.

त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.