¶ तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे रहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल.
TSK
TSK · मत्त. 22:17
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ आम्ही तुम्हास कळवतो की, मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये.
या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
¶ कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.
¶ त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी.
यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.”
त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.
परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे.