TSK

TSK · मत्त. 25:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.

“लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.

‹मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा!›

‹लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा.›

आणि प्रकाशातील पवित्रजनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.

कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?

“पहा, तो ढगांसह येत आहे,” “प्रत्येक डोळा त्यास पाहील, ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,” पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.” असेच होईल, आमेन.

¶ जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, ‹“होय, मी लवकर येतो.”› आमेन, ये प्रभू येशू, ये.