TSK

TSK · मत्त. 26:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.

जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?

पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”

¶ येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.

¶ यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.”

आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.

आता मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की, तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे.

तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले.

¶ मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.