तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.
TSK
TSK · मत्त. 4:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
देवाच्या आत्म्याने मला वर उचलले, आणि माझ्या मागे मी भुकंपासारखा मोठा आवाज ऐकला, तो म्हणाला; त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे!
मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.
आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.
मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले.
¶ येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले.
ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला.
कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.