TSK

TSK · मत्त. 7:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.

‹कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.›

¶ ‹“दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.›

¶ तेव्हा दुसर्‍याला दोष लावणार्‍या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.

मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

¶ माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे.