TSK

TSK · मत्त. 8:34

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?”

अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”

जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’

तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले.

तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस.

मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.