हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
TSK
TSK · मत्त. 9:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, ‹“निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”›
आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना,
‹परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, अन्यायी, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही.›
‹तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.›