TSK

TSK · मत्त. 9:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.

तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण मा‍झ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.

तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

¶ नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,

आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.

¶ तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता.

नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”

¶ एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?”

तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.

मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.”

तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”