TSK

TSK · मीखा 1:6

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ आणि हिज्कीया राजाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा, एलाचा मुलगा होशे ह्याच्या सातव्या वर्षी, असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला.

तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.

मवाबाची उंच तटबंदी व सुरक्षीत ठिकाणे नष्ट करील.

परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन.

सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत.

शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.”

तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!