शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.
TSK
TSK · नहू 2:8
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो, आम्ही न्यायाची वाट पाहातो पण काही नाही; तारणाची वाट पाहतो परंतु ते आम्हापासून फार दूर आहे.
बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा. जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येकजण आपल्या लोकांकडे वळतील; त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या.
बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
¶ मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.