अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये.
TSK
TSK · नहे 13:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरूशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य मनुष्यापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली.
¶ पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”
तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.
¶ ते आपल्या जागेवर उभे राहिले आणि आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचत राहिले. पुढे आणखी सहा तास त्यांनी आपल्या पातकांची कबुली दिली आणि आपला देव परमेश्वरापुढे नमन केले.
गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
¶ नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले की,
¶ मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”