¶ भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
TSK
TSK · नहे 13:12
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.
¶ दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा.
¶ तसेच परमेश्वराच्या मंदिरातील कोठारांसाठी याजकांकडे पिठाचा पहिला उंडा. धान्यार्पणाचा पहिला भाग, आमच्या सर्व वृक्षांच्या फळांचा पहिला बहर, नवीन काढलेला द्राक्षरस आणि तेल यांचा पहिला भाग, या गोष्टी आणू. तसेच लेवींना आमच्या पिकातला एक दशांश भाग देऊ. कारण आम्ही काम करत असलेल्या सर्व नगरांतून आमच्या उत्पन्नाचा दहावा भाग लेवी घेतात.
¶ त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.