TSK

TSK · गण 12:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला.

तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते

मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नाव मी जाहीर करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्याच्यावर दया करीन.

तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली.

अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले;

ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.

¶ परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.

मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.

तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?

मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग.

यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन.

देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

‹मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत.›

आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,

जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.

म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.

पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.

¶ तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात.