¶ ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
TSK
TSK · गण 19:22
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
¶ त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
¶ जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
¶ याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
‹कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.›