¶ परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
TSK
TSK · गण 21:23
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
म्हणजेच हेशबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाज गावात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली.
¶ “हेशबोनापासून एलालेपर्यंत, याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम व एगलाथ-शलिशीयापर्यंत त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे, कारण निम्रीमाचे पाणी सुद्धा आटले आहे.