वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.
TSK
TSK · गण 4:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर.
तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपामधील सेवा करण्यास व ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली;
तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
¶ हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
¶ जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता
¶ शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
¶ हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.