TSK

TSK · ओब 1:12

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.

खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.

कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.

माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.

तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.

ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर. पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील.

इस्राएल लोकांचे वतन ओसाड झाले म्हणीन जसा तुला आनंद झाला होता तसेच मी तुलाही करीन. हे सेईर पर्वता तू ओसाड होशील व संपूर्ण अदोम तो सारा नाश होईल. मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.

¶ तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,

कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.

आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.